Bhor Assembly Election 2024 | ही भारतीय काँग्रेस नसून संग्राम काँग्रेस आहे; महायुतीच्या शंकर मांडेकरांची संग्राम थोपटे यांच्यावर टीका
महायुतीच्या बूथ कमिटीची बैठक संपन्न
पिरंगुट : Bhor Assembly Election 2024 | भोर विधानसभा मतदार संघात काँग्रेस हा पक्ष राहिलेला नसून तो संग्राम काँग्रेस पक्ष झाला आहे, अशी टीका महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी आज पिरंगुट मध्ये केली.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक पिरंगुट येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे आमदार डॉ.वाय ए नारायण स्वामी, आमदार शरदराव ढमाले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा नंदू शेठ भोईर, मुळशी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकुश मोरे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, ज्येष्ठ नेते किसान नांगरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजगड किरण राऊत, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाबा कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन अमराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुका अध्यक्ष अनुप मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की, विद्यमान आमदारांनी केलेल्या क्रीडा संकुलनाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. पुन्हा जर त्यांना निवडून दिले तर ते मतदार संघात येणार नाहीत, “जे कार्यकर्ते विद्यमान आमदारांसाठी निवडणुकीमध्ये कष्ट घेतात, त्यांच्याकडे नंतर लक्षही देत नाहीत, आमदार नगरपालिका जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तुमच्या प्रचारासाठी सुद्धा येणार नाहीत याची मला खात्री आहे”
तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठींबा दिल्याचे सांगत मांडेकर म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीत विजयाचा इतिहास घडवूया त्यासाठी बूथ कमिट्या बळकट करा असे आव्हान त्यांनी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना केले.
मुळशीतील तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे गावांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळी आहेत. स्थानिक तरुणांना तालुका व त्यांचे गाव सोडून इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जावे लागते. याला सर्वस्वी आमदार जबाबदार आहेत. तरुणांना रोजगार व मतदार संघातील इतर प्रश्न लवकरात लवकर सोडून ते मार्गी लावण्याचे काम मी करेन अशी ग्वाही मांडेकर यांनी यादरम्यान दिली.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !