Bhor Assembly Election 2024 | जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भोर – Bhor Assembly Election 2024 | भोर राजगड वेल्हा विधानसभा मतदार संघामधून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar NCP) उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
भोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मांडेकरांच्या रॅलीला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, पीडिसीसी बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, मा उपसभापती सारीका मांडेकर, मा नगरसेवक सुषमा निम्हण, मा . युवक अध्यक्ष सागर साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ हगवणे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चंदाताई केदारी,केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे,,पांडुरंग निगडे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,मा नगरसेवक प्रमोद निम्हण, श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे , विक्रम बोडके, संग्राम निगडे, मुळशी तालुका युवक अद्यक्ष सुशिल हगवणे , मुळशी तालुका अद्यक्ष अंकुश मोरे, माऊली साठे आदी उपस्थित होतें.
यावेळी माध्यमांशी बोलताना मांडेकर म्हणाले की, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली आहे. मी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते त्या सर्वांची भेट घेणार आहे. आम्ही सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.
त्याच विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरा जाणार आहे.
भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या भागात परिवर्तन होणार आहे.
त्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्याही मतभेदाचे संभ्रमाचे वातावरण
नसल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा