Bhor Assembly Election 2024 | ‘आमदारांनी फक्त स्वतःच्या घरच्यांना मोठं केलं’ – शंकर मांडेकर

Shankar Mandekar

मुळशी : Bhor Assembly Election 2024 | विद्यमान आमदारांनी आपल्या घरच्यांशिवाय दुसरं कोणाला मोठं केलं नाही. त्यामुळं आता आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे. मी स्वतःपुरत न बघता आधी मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देईल, अशी ग्वाही महायुतीचे भोर विधानसभेचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी दिली.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर मुळशी तालुक्यातील ताथवडे, जांबे, नेरे कासारसाई, दत्तवाडी, मारुंजी, हिंजवडी या गावांना भेट दिली. यावेळी मांडेकरयांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. अनेक ठिकाणी त्यांच्यावर जेसीबी वरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर बैलगाडीवरुन मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, किरण राऊत, राजाभाऊ रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक कारंजावणे, गोविंद निकाळजे, नंदू भोईर , पै. राजाभाऊ जाधव, संदीप पवार, विजय गायकवाड, दीपक टेमगिरे, योगेश शिंदे, गणेश गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, आनंदा लाटे, गणपत जगताप, सागर साखरे, कपिल बुचडे, सचिन जांभुळकर, दिनेश पिंजन, कौस्तुभ शिखरे, गणेश शिंदे.आदी मान्यवर उपस्थित होते.

मांडेकरांनी मतदारसंघातील गाव आणि सोसायटी मध्ये मतदारांची भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. मांडेकर म्हणाले की ” मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ असूनही मुळशीतील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मुळशी तालुक्यात औद्योगीकरण नसल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील युवा पिढीला बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं. याला सर्वस्वी जबाबदार विद्यमान आमदार आहेत. त्यांनी केवळ त्यांच्या घरच्यांना मोठं केलं. रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका, मतदारसंघाचा विकासासाठी मतदान करा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रचारार्थ आज (रविवारी) भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दुपारी १ वाजता राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed