Bhor Assembly Election 2024 | शंकर मांडेकर यांची जोरदार मुसंडी! भोर, राजगड, मुळशीतून संग्राम थोपटे यांना प्रचंड विरोध!

Bhor Assembly

भोर – Bhor Assembly Election 2024 | भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) उमेदवार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) Ajit Pawar NCP उमेदवार शंकर भाऊ मांडेकर (Shankar Mandekar) यांनी जोरदार मुसंडी मारत तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) आणि त्यानंतर यांचे पुत्र व विद्यमान आमदार संग्राम थोर थोपटे यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे यांनी राज्य केले. यंदा मात्र त्यांना मोठ्या प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी भोर विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे करून ग्राउंड रिपोर्ट तयार केला. त्यामध्ये थोपटे यांच्या विरोधात असलेल्या लाटेची प्रकर्षाने जाणीव झाली.

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

बेरोजगारीची समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव, थोपटे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या कामकाजासंदर्भात नाराजी, आरोग्य व्यवस्थेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक प्रश्नांकडे या सर्व्हेदरम्यान नागरिकांनी बोट दाखवले.

या समस्या सोडवण्यासाठी संग्राम थोपटे हे अपयशी ठरले आहेत. अशावेळी शंकर भाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून विकासाची दृष्टी आणि झपाटा असलेला तगडा उमेदवार या मतदारसंघात उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्यच आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

होम पीच वरूनच विरोध

मुळशी येथील असलेल्या शंकरभाऊ मांडेकर यांना मुळशीतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
संग्राम थोपटे हे मूळचे भोर येथील आहेत. त्यामुळेच त्यांना घरच्या मैदानातून जोरदार पाठिंबा मिळेल
अशी अपेक्षा होती. परंतु या सर्व्हेमध्ये आश्चर्यकारकरीत्या भोर येथून देखील थोपटे घराण्यासंदर्भात नाराजी उमटली आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगलेल्या थोपटे घराण्याने भोर, राजगड,
मुळशी परिसर मागासच ठेवला आहे. आम्ही संधी देऊनही त्यांनी मतदारसंघाचा विकास केलेला नाही.
त्यामुळेच यंदा भोर विधानसभा मतदारसंघात आम्ही बदल घडवणारच, अशा शब्दांत भोर,
राजगड आणि मुळशीतील नागरिकांनी निर्धार व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Assembly Election 2024 | महायुतीतील ‘पुरंदर’च्या लढ्याचे लोन ‘हडपसर’मध्ये पसरण्याची शक्यता !

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद ! किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

Raj Thackeray | पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका; राज ठाकरेंनी घेतली दखल; कारवाईचे संकेत

You may have missed