Bhor Assembly Election 2024 | भोर विधानसभा मतदार संघातील जनता हेच माझे कुटुंब : शंकर मांडेकर
मुळशी : Bhor Assembly Election 2024 | “मतदार संघातील जनता हेच माझे कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन,” असे वचन भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी गावभेटी दरम्यान दिले.
शंकर मांडेकर यांनी आज मुळशी तालुक्यातील यामध्ये भरे, अंबरवेट, सुतारवाडी, कासारआंबोली, बलकवडेवाडी, उरावडे, आंबेगाव, भिलारवाडी, मारणेवाडी, शेलारवाडी, काळभोरवाडी, बोतरवाडी, कांजनेवस्ती, गाडेवाडी, मुकाईवडी, वरपेवडी, खाटपेवाडी, भुकुम, अंग्रेवाडी, भूगाव, बावधन या गावांमध्ये दौरा केला. या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी मांडेकर यांचे ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. अनेक ठिकाणी जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
पुढच्या पाच वर्षांत भोर तालुक्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “मतदारसंघाच्या विकासावर माझे विशेष लक्ष असेल आणि तालुक्याच्या उन्नतीसाठी मी सतत कार्यरत राहीन,” अशी ग्वाही शंकर मांडेकर यांनी दिली.
मांडेकरांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोटावड्यात सभा
शंकर मांडेकर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. रविवारी (दि.१० नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता घोटावडे मुळशी येथील दत्तकृपा मंगल कार्यालयात ही सभा होणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)