Bhor Assembly Election 2024 | सत्ता असताना चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था ही उभारता आल्या नाहीत हे कसले कर्तृत्ववान आमदार? महायुतीच्या शंकर मांडेकरांची संग्राम थोपटेंवर टीका

Shankar Mandekar

वेल्हे:  Bhor Assembly Election 2024 | सलग सत्ता असूनही चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था तालुक्यात उभारता आल्या नाहीत. त्यामुळं इथल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडावा लागतोय, अशी टीका महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यावर केली. (Bhor Assembly Election 2024)

निवडणुकीला आठ दिवस राहिलेल्या असताना मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान तालुक्यातील विविध गावांना मांडेकर यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्या समवेत रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे हे महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की, वेल्हे या तालूका दुर्गम असला तरी गेल्या ५० वर्षात इथं मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज इथले सत्ताधारी देऊ शकले नाहीत. एवढच काय तर चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्यांना निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी आपला गाव सोडावा लागतोय.

“रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तालुका विकासापासून वंचित राहिला आहे विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. असे सांगताना मांडेकर म्हणाले की, मतदारांनी संधी दिल्यास पुढच्या पाच वर्षात कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करेल हा शब्द देतो.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed