Bhosari Assembly Election 2024 | भोसरी विधानसभेवरून तिढा वाढला; उद्धव ठाकरेंकडूनही भगवा फडकवण्याचा नारा; पवार राजी होणार?

Sharad Pawar uddhav thackeray

भोसरी : Bhosari Assembly Election 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) रवी लांडगे (Ravi Landge) यांनी भाजपाला (BJP) रामराम ठोकत आज मंगळवारी (दि.२०) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (Shivsena UBT) प्रवेश केला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून शहरातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar NCP) सुरुंग लावल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या गळाला भाजपचा जुना नेता सापडल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान लांडगे यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्याचा नारा देत हा मतदारसंघ आपल्याकडे असेल असे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभेचा तिढा आणखी वाढला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला यासाठी राजी करण्यात उद्धव ठाकरेंना यश येणार का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार असणार आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी थेट लढत होणार आहे. भाजपकडून लांडगे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्यासोबत यावेळी शिंदेंची शिवसेना आहे. पण त्यांची फारशी ताकद नाही. रवी लांडगेंच्या प्रवेशामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही ताकद आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत सुलभा उबाळे (Sulbha Ubale) आणि नुकत्याच दाखल झालेल्या रवी लांडगेंमध्ये रस्सीखेच असेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित गव्हाणे इच्छूक आहेत. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा दावा सध्यातरी मजबूत असेल. पण लोकसभेप्रमाणे काही जागांची अदलाबदल करून भोसरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरेही ताकद लावतील यात शंका नाही. (Bhosari Assembly Election 2024)

भोसरीमध्ये अनेक वर्षांपासून लांडे आणि लांडगे कुटुबीयांचे वर्चस्व आहे.
विलास लांडे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे महेश लांडगे यांच्या विरोधात रवी लांडगे यांना उमेदवारी मिळाल्यास ही लढत रंगतदार ठरू शकते.
उबाळे यांनीही २०१४ च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली होती.

यावेळी ठाकरेंची शिवसेना शरद पवारांसोबत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील
यांना या मतदारसंघातून केवळ नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीत हा आकडा ३७ हजार एवढा होता.

आता रवी लांडगे यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला त्याचा फटका बसू शकतो.
परिणामी, महेश लांडगे यांना यावेळी निवडणुकीच्या मैदानात चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीत या जागेचा तिढा कसा सुटणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

You may have missed