Bhosari Pune Crime News | भाऊ तुरुंगात गेल्याने बहिणी करु लागल्या हप्ते वसुली ! हप्ता न देणार्या मच्छी विक्रेत्या महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न, गुंडांच्या बहिणीच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : Bhosari Pune Crime News | गुंड भाऊ तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या दोन बहिणी मच्छी विक्रेत्यांकडून हप्ते वसुली करु लागल्या. हप्ता न देणार्या महिलेवर कोयत्याने वार करुन त्यांनी महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या बहिणींच्या त्रासाला कंटाळून मच्छी विक्रेत्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत रेश्मा सिकंदर शेख (वय २९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलिसांकडे (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उज्वला अमोल गायकवाड (रा. घरकुल, चिखली) आणि रसिका गोविंद जगताप (रा. भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरीमधील मच्छी मार्केटमध्ये ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मच्छी मार्केटमध्ये दुकान आहे. उज्वला व रसिका या तेथे आल्या. यापूर्वी माझा भाऊ कुक्या यास हप्ते देत होता. तो आता जेलमध्ये आहे. आता आम्हा दोघींना हप्त्याचे पैसे द्यावे लागतील, नाही दिले तर तुम्हाला धंदा करु देणार नाही, अशी धमकी त्यांनी फिर्यादी व इतर दुकानदारांना दिली. फिर्यादी व इतर बायकांकडून दर महिन्याला प्रत्येकी ७०० रुपये हप्त्याची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत म्हणून या दोघी गेली १५ ते २० दिवसांपासून धमक्या व शिवीगाळ करत होत्या. या दोघी ८ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या दुकानावर आल्या. तिला तू दुकान लावण्याचे दोन महिन्यांचे हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत का दिले नाहीस, तुला जास्त माज आला आहे काय?, असे म्हणून दोघींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली.
उज्वला हिने आम्ही दोघी तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या हल्ला केला.
रसिका हिने हातातील कोयता फिर्यादीच्या मानेवर मारुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
परंतु, तिने मारलेला कोयता फिर्यादी हिने चुकविला. त्यामुळे फिर्यादी हिला कोयता लागला नाही.
त्यानंतर दोघी निघून गेल्या. गेल्या तीन महिन्यांपासून या दोघी देत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी हिने दुकानातील झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
हे पाहून इतर महिलांनी तिला तातडीने वाय सी एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तेथे तिच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहारे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु