Bibvewadi Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दुकानदाराच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; 60 वर्षाच्या आरोपीला अटक, बिबवेवाडीतील घटना

chaku

पुणे : Bibvewadi Pune Crime News | गेल्या वर्षी दिवाळीत झालेल्या वादाच्या कारणावरुन एका ६० वर्षाच्या आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

सतिशा मुरलीघर ढोले (वय ६०, रा. वैष्णवी देवी हाईटस, सुखसागरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत कार्तिकेश दशरथ राणे (वय २३, रा. वैष्णवी देवी हाईटस, सुखसागरनगर, कोंढवा) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोअर इंदिरानगरमधील शनि मंदिराच्या बाहेरील पुजा साहित्य विक्री दुकानात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. राणे यांचे लोअर इंदिरानगर येथील शनि मंदिराच्या बाहेर पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये दिवाळीत सतिश ढोले हे त्यांच्या पुजा साहित्य दुकानात आले असताना त्यांच्या किरकोळ वाद झाला होता. या जुन्या भांडणावरुन ढोले कार्तिकेश राणे यांना नेहमी बोलत असत. शनिवार असल्याने शनि मंदिरात भाविकांची गर्दी होती. तसेच राणे यांच्या दुकानातही भाविक येत होते. राणे हे दुकानावर पुजा साहित्य विक्री करताना ढोले तेथे आले.

फिर्यादीशी बोलत बोलत ढोले हे राणे यांच्या पाठीमागे गेले. अचानक त्यांनी राणे यांचे हाताने तोंड दाबले. ”मला मरायला येतो काय आता तुला खल्लास करतो,” असे म्हणून ढोले याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे उजव्या बाजूचे गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे डावे हाताच्या अंगठ्यास जखम झाली. सतिश ढोले याला जागेवरच पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024 | ‘आता बँकेला ३०० कोटी …’, अजित पवार गटातील आमदाराचे मोठे विधान; म्हणाले – ” नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो…”