Bibvewadi Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणाला बांबुने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
पुणे : Bibvewadi Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला बांबु व सिमेंटचा ब्लॉकने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत रोहित राजेंद्र गाडे (वय ३४, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेशन लावडे, प्रथमेश कचरे, श्रेयस कांबळे, शुभम (सर्व रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता फिर्यादी यांच्या घरामागे घडला. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. गणेशन लावडे याच्याबरोबर फिर्यादी यांचे भांडण झाले होते. या कारणावरुन गणेशन हा हातामध्ये बांबु घेऊन आला. त्याचे तिघे साथीदार हातामध्ये सिमेंटचा ब्लॉक घेऊन येऊन त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.
गणेशन याने या सगळ्यांना आज सोडायचे नाही संपवून टाकायचे मारा यांना असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात, नाकावर, डोळ्यावर बांबु व सिंमेटचा ब्लॉक मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत. (Bibvewadi Police Station)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?