Bibvewadi Pune Crime News | कुत्र्यावरुन झालेल्या भांडणात तलवार, चाकूने पती-पत्नीवर केले वार ! दुचाकी, कारवर दगडफेक करुन फोडल्या काचा

पुणे : Bibvewadi Pune Crime News | लोकांचे श्वानप्रेम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातून मग लोकाच्या भावनांचा कडेलोट होऊ लागला आहे. त्यातूनच कुत्र्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून महिला व पाच ते सहा मुलांनी तलवार व चाकूने पती-पत्नीवर वार (Stabbing Case) करुन जखमी केले. तसेच दुचाकी व कारवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडल्या.
याबाबत मनिषा मुन्ना पांढरे (वय ३०, रा. चैत्रबन वसाहत, अपर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिपाली सुरेश् दयाळू (रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि तिच्या सोबतच्या पाच ते सहा मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फिर्यादीच्या राहते घरासमोर गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्रबन वसाहतीत फिरणार्या भटक्या कुत्र्यांना फिर्यादी या खाणे देत होत्या. या कुत्र्यांचा सोसायटीतील लोकांना त्रास होतो. त्यांना खाणे दिल्याने ती सोसायटीत येतात. यावरुन फिर्यादी आणि दिपाली दयाळू यांच्यात आदल्या दिवशी भांडणे झाली होती. गुरुवारी रात्री फिर्यादी व त्यांचे पती हे घरात असताना दिपाली व पाच ते सहा मुले आली. कुत्र्यावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीच्या दोन्ही हातावर व डावे पायाचे मांडीवर चाकूने व तलवारीने वार करुन जबर जखमी केले. फिर्यादीचे पती मुन्ना पांढरे यांना लोखंडी हत्याराने मानेवर, खांद्यावर, काखेजवळ, गुडघ्यावर व पायाचे बोटावर वार करुन जखमी केले. घराबाहेर फिर्यादीची दुचाकी व कार यांच्यावर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Bibvewadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण