Bibvewadi Pune Crime News | पुणे: फायनान्स मॅनेजर असलेल्या महिलेच्या घरात शिरुन कॉलेजच्या ट्रस्टींनी दिली धमकी ! ट्रस्टी म्हणाला – ‘आमच्या सांगण्याप्रमाणे काम कर नाही तर परिणाम भोगायला तयार रहा’

Molestation-Case

पुणे: Bibvewadi Pune Crime News | कॉलेजच्या व्यवहारात आपल्या सांगण्यानुसार काम करीत नसल्याने कॉलेजच्या ट्रस्टींनी फायनान्स मॅनेजर असलेल्या महिलेच्या घरात शिरुन तिला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे काय परिणात होतील ते भोगण्यासाठी तयार रहा़ तुला कामावरुन काढून टाकू अशी धमकी दिली.

याबाबत एका ३२ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युनिय बिबलीकल सेमीनारी सोसायटीचे (Union Biblical Seminary Pune) मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे Dr Subhash Dongardive (वय ६१) आणि डेव्हिड हटारिया Devid katariya (वय ६३) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बिबवेवाडी येथील युनियन बिबलीक सेमीनारी सोसायटीच्या कॉलेजचा सर्व व्यवहार पहात असतात. विद्यार्थ्यांकडून चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात जमा होणारी फीमधून कॉलेजच्या सर्व व्यवस्थापनाची मंजुरी घेऊन ज्या त्या विभागाचा खर्च देत असतात. जून २०२४ मध्ये कॉलेजचे मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे हे फिर्यादीच्या ऑफिसमध्ये आले. विद्यार्थ्यांकडून जमा होणारी सर्व फी चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात न घेता ती आता रोख स्वरुपात घ्या. जमा झालेली रोख रक्कम यापुढे आम्हाला द्या असे फिर्यादींना म्हणाले. तेव्हा फिर्यादी यांनी विद्यार्थ्यांकडून रोख स्वरुपात फी घेता येणार नाही. ते शासनाच्या नियमावलीच्या विºद्ध आहे, असे सांगितले. त्यावर ते चिडून निघून गेले. फिर्यादी या घरी असताना १० जून २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. डोंगरदिवे व डेव्हिड हटारिया हे बेधडक घरात शिरले. त्यांनी फिर्यादींना धमकावून तू आमच्यासाठी कॉलेजची फी रोख स्वरुपात घे व तु आमची टीम जॉइन्ट कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले तर, तुझा पगार वाढवू शिवाय तुला प्रमोशन देऊ. तु आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे काय परिणाम ते भोगण्यासाठी तयार रहा. नाही तर आम्ही तुला कामावरुन काढून टाकू, अशी धमकी दिली व ते घरातून निघून गेले.

आपली नोकरी जाईल या भितीपोटी घाबरुन त्यांनी हे कोणासही सांगितले. या दडपणामुळे त्या आजारी पडल्या. पती व इतरांनी धीर दिल्यानंतर आता त्यांनी तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | निवडणूक आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केलीय; रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप,
5 कोटी पकडले पण बाकीचे पैसे नेत्याच्या घरापर्यंत पोहचवले गेले