Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ! पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये
पुणे : Bibvewadi Pune Crime News | पत्नीने घटस्फोट व पोटगीसाठी दाखल केलेला दावा, त्यात एका मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दाखल केलेला पोस्कोचा गुन्हा (POCSO Act) याच्या दडपणाखाली एका तरुणाने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली असून त्यात पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई शिला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शितल विजय पिंगळे (सर्व रा. पौड, ता. मुळशी) ऋषीकेश ऊर्फ भाई सुनिल खेडकर, सुनिल शिवलिंग खेडकर, भूषण सुनिल खेडकर (रा़ नसरापूर, ता़ भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस आणि ऐश्वर्या यांचा विवाह झाला होता. त्यांचे पटत नसल्याने ते वेगळे राहू लागले होते. तेजस याचा व्यवसाय होता. तेजस याच्या पत्नीने घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तेजस हा ९ ऑगस्ट रोजी घरात एकटा असताना त्याने मध्यरात्रीच्या सुमारास घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Bibvewadi Pune Crime News)
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (PI Mangal Modhave) यांनी सांगितले
की, तेजस याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
त्यात सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
तेजस याच्यावर पोस्को अतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो दारु पिला असल्याचे आढळून आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक नकुंभ तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु