BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु
पुणे : BJP Executive Meeting In Pune | लोकसभेला राज्यात मिळालेल्या कमी प्रतिसादाबाबत चिंतन आणि मनन करण्यासाठी भाजपकडून पुण्यात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाला हजारो पदाधिकारी उपस्थित आहेत. मंंडल प्रमुखापासून ते राज्याच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांंना या अधिवेशनात मार्गदर्शन केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडून संवाद यात्रा काढली जाणार आहे.
विधानसभेसाठी व्यूहरचना, याचे आराखडे पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आज रविवारी (२१ जुलै) पार पडत असलेल्या प्रदेश कार्यकारणीच्या अधिवेशनात बांधले जात आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित आहेत. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत. (BJP Executive Meeting In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत