BJP First List For Maharashtra Assembly Election 2024 | भाजपच्या जाहीर झालेल्या 99 उमेदवारांच्या यादीत 13 महिलांना स्थान; जाणून घ्या
मुंबई : BJP First List For Maharashtra Assembly Election 2024 | भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काही जणांची तिकिटे कापण्यात आली आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपच्या या ९९ उमेदवारांच्या यादीत १३ महिलांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपने भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर कल्याण पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे इच्छुक होते.
गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद राज्यभरात चर्चेत होता. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. मात्र त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी भाजपाने या मतदारसंघात गणपत गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली तर मी अपक्ष निवडणूक लढवणार, असा इशारा दिला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीत वाद पाहायला मिळणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनी जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचे दीर , शहराध्यक्ष शंकर जगताप या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
चिखली – श्वेता विद्याधर महाले, भोकर – श्रीजया अशोक चव्हाण, जिंतूर – मेघना बोर्डिकर, फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण,
नाशिक पश्चिम – सीमाताई महेश हिरे, कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड, बेलापूर – मंदा विजय म्हात्रे, दहिसर – मनीषा अशोक चौधरी,
गोरेगाव – विद्या जयप्रकाश ठाकूर, पर्वती – माधुरी सतीश मिसाळ, शेवगाव – मोनिका राजीव राजळे, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते,
केज – नमिता मुंदडा, याप्रमाणे मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. (BJP First List For Maharashtra Assembly Election 2024)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?