BJP Leader On Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण काढत भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा; म्हणाले,”शिंदे यांचे अधिकार जितके आहेत तेवढेच…”
नंदुरबार: BJP Leader On Eknath Shinde | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असताना मराठा-ओबीसी आरक्षणासह (Maratha-OBC Reservation) आता धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा तापल्याचं दिसत आहे. यावरुन आता सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) मतभेद आणि संघर्ष व्हायला सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेत्यानेच टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे शिक्षण काढत मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर दिला आहे.
https://www.instagram.com/p/DAdT7L8p7Oj
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. यावर भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) हे आक्रमक झाले आहेत. पद्माकर वळवी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जितके आहेत तेवढेच त्यांनी वापरावेत. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे.
https://www.instagram.com/p/DAdRtjGihkL
शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही. धनगर समाजाला शॉर्टकट आरक्षण देण्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जीआर (Dhangar Samaj GR) कसा देऊ शकतात? जीआर देणे ही अतिशय गंभीर बाब आहे.
https://www.instagram.com/p/DAdPb39iJrp
येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिले जात आहे. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहून सरकारसोबत (Mahayuti Govt) भांडण केले पाहिजे”, अशी भूमिका भाजप नेते पद्माकर वळवी यांनी घेतली आहे.
https://www.instagram.com/p/DAdNS2hiA32
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)