BJP Leader Prabhat Jha Death | माजी राज्यसभा खासदार प्रभात झा यांचे निधन
ऑनलाइन टीम – BJP Leader Prabhat Jha Death | माजी राज्यसभा खासदार आणि मध्यप्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे शुक्रवारी गुरूग्राममधील मेदांता रूग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
झा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना महिनाभरापूर्वी दिल्लीत उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले होते. उपचारा दरम्यान शुक्रवारी झा यांनी अखेरचा श्चास घेतला. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बिहारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने सीतामढी येथे नेण्यात येणार आहे.
प्रभात झा यांचा अल्पपरिचय
झा मूळ बिहारचे होते. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे झा नंतर भाजपमध्ये सामील झाले. २०१० मध्ये ते मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. झा २००८ साली मध्य प्रदेशमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. २०२० पर्यंत त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व भूषवले. २०१५ मध्ये त्यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. भाजपसाठी त्यांनी दिल्ली, पंजाब आणि चंदिगढचे पक्ष प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे. (BJP Leader Prabhat Jha Death)
मुख्यमंत्री यादव यांनी व्यक्त केला शोक
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी झा यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना म्हंटले आहे
की, “मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय श्री प्रभात झा
यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी मिळाली.
बाबा महाकाल दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल परिवाराला हा भीषण धक्का सहन करण्याची शक्ती देवो.
मध्य प्रदेशच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील.
प्रभात झा यांच्या निधनाने राजकीय जगताची कधीही भरुन न येणारी हानी आहे. ओम शांती!”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता