BJP Leader Sudhakar Khade Murder | भाजप नेत्याच्या हत्येने सांगली हादरली, भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत संपवलं, घटनेने परिसरात खळबळ
सांगली: BJP Leader Sudhakar Khade Murder | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) धामधूम आहे. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आता सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे.
पंढरपूर रोडवरील राम मंदिर जवळ खाडे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच घटनेच्या ठिकाणी मिरज पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)