BJP MLA Ganpat Gaikwad | गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी? मग हेच समान न्यायाचे तत्व देशमुख आणि मलिकांना का नाही? विरोधकांचा आक्षेप

Ganpat Gaikwad- Anil Deshmukh-Nawab Malik

मुंबई : BJP MLA Ganpat Gaikwad | विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Maharashtra) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानाची परवानगी नाकारली होती मात्र गणपत गायकवाड यांना मतदानाची दिलेली परवानगी आणि न्यायाच्या समानतेचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी न्यायालयाला परवानगी मागण्यात आली होती परंतु न्यायालयाने ती नाकारली होती. मात्र आता भाजप आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात तुरुंगात असताना त्यांना मतदानाची परवानगी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘न्याय सर्वांना समान’ अशी चर्चा सुरु झाली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीनही उमेदवार जिंकतील. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाची परवानगी दिली नाही, त्यामुळे गायकवाड यांच्याबाबत चुकीचा निर्णय दिला आहे.”

अनिल देशमुख म्हणाले, ” खोट्या केसेस करून मला तुरुंगात टाकले होते त्यावेळेस विधानपरिषदेची निवडणूक होती. त्या निवडणुकीत मतदानाची परवानगी मी मागितली होती मात्र मला कोर्टाने परवानगी नाकारली होती. खालच्या कोर्टाने आणि हायकोर्टाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे मी मतदान करू शकलो नव्हतो.”

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, “गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिली. लोकशाही धोक्यात आहे. सर्वांना समान न्याय पाहिजे.” (BJP MLA Ganpat Gaikwad)

कायदेतज्ज्ञ असिम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “नैसर्गिक न्याय प्रक्रिया पाळल्या जात नाही. न्यायाची समानता नाही हे बऱ्याचदा दिसले आहे. गणपत गायकवाड यांना अत्यंत गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा दिली आहे. तुरुंगात असताना त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंद आहे, पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांना मागच्यावेळी विधानपरिषदेला मतदान करता आले नाही. त्यामुळे असा दुजाभाव चांगला नाही. सातत्याने आम्ही सांगत आहोत हे कायद्याचे राज्य राहीले नाही ‘काय द्यायचे’ असं राज्य झालं आहे.” असे सरोदे म्हणाले.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली होती,
यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
गणपत गायकवाड यांना दिलेली मतदानाची परवानगी आणि
न्यायाच्या समानतेचा मुद्दा विरोधकांनी जोरदार उचलला आहे.
न्याय सर्वांसाठी समान असावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed