BJP MLA On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंकडे बोट करत भाजप आमदाराचा मोठा निर्णय; निवडणूक लढवण्यास नकार

Dhananjay-Munde

बीड: BJP MLA On Dhananjay Munde | महायुतीमधून (Mahayuti) आणखी एक वाद समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोट करत भाजप आमदाराने आपण निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

” पालकमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राजकारण करायचे तरी कशाला, चांगल्या कामाला सहकार्य करू. मी पक्ष सोडणार नाही, पण मी आणि आमच्या घरातील कोणीच निवडणूक लढवणार नाही “, असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार (MLA Laxman Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आमदार पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून अन्याय केला जात असल्याची खदखदही व्यक्त केली आहे. (BJP MLA On Dhananjay Munde)

आमदार लक्ष्मण पवार म्हणाले, “आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, “गेल्या काही महिन्यांपासून मी आजाही आहे. पण, आजारापेक्षा माझी नाराजी जास्त आहे. पक्षश्रेष्ठींसमोर मी हा विषय बोललो. त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. २०१४ ते २०१९ हा माझ्या आमदारकीचा काळ मला समाधान देणारा राहिला.”

ते पुढे म्हणाले, ” १० वर्षांपूर्वी जे राजकारण होते तसे आता राहिले नाही. ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही. नैतिकतेला बरे वाटत नाही. त्यामुळे आपण बाजूला झालेले बरे. म्हणून मी हळूहळू मनाला न पटणाऱ्या बाबीतून बाजूला होत आहे. कुठलीही उमेद राहिलेली नाही. काम करत असताना सोबतचे आणि वरचे बळ देणारे असतील तर आणखी गतीने काम होते. आता अशी परिस्थिती राहिली आहे का?”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“मी ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्या व्यथा मांडण्याची माझी जबाबदारी आहे की नाही?
गेवराईमध्ये एक चांगला तहसिलदार मागितला होता. जो नियमात काम करणारा असेल.
पण, जेवढे तहसिलदार गेवराईत आले, ते सर्व वाळुवाल्यांशी संगनमत करणारे होते.

मी वाळुवाल्यांविरोधात लढा दिला. त्याला बळ देणारे अधिकारी हवे होते.
पालकमंत्र्यांकडे तहसिलदारांच्या तक्रारी केल्या. त्या पालकमंत्र्यांनी कधीच गांभीर्याने घेतल्या नाही”, असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी धनंजय मुंडेंकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed