BJP On Rahul Gandhi | राहुल गांधींच्या वादग्रस्त टिप्पणीवर भाजपकडून नवी रणनीती; महाविकास आघाडीला फटका बसणार?
पुणे : BJP On Rahul Gandhi | “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येऊ शकतो,” असं विधान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात केले होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
https://www.instagram.com/p/DAIVYxOtGGa
केंद्रीय नेत्यांनी गांधींविरुद्ध खोचक टिप्पणी केल्याने भाजपने हाच मुद्दा लावून धरला. राज्यातील भाजपच्या नेत्यांनीही काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी गांधींच्या आरक्षण विधानाचा फायदा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/DAIQXmmp1uS
लोकसभा निवडणुकीत मतदारांना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजुने वळविण्यासाठी काँग्रेसने संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणाच्या मुद्द्यांचा अजेंडा राबवला होता. ज्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये भाजपचे नुकसान झाले. तेच आता राहुल गांधींच्या विधानावरून आगामी विधानसभेसाठी महायुती (Mahayuti) करण्याच्या तयारीत आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
https://www.instagram.com/p/DAGuidWC7D2
महायुतीने राहुल गांधींच्या विधानाचा उपयोग करून काँग्रेसविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू करण्याची योजना आखली आहे. राहुल गांधींच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे भाजपला महाराष्ट्रात काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी विधानसभेच्या तोंडावर मुद्दा मिळाला आहे. (BJP On Rahul Gandhi)
https://www.instagram.com/p/DAGod-kimk7
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!