BJP On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाजपाची खोचक टीका, म्हणाले – “मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात”

Keshav Upadhye Uddhav Thackeray

मुंबई : BJP On Uddhav Thackeray | मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहण्यास मिळालं. त्यामुळे यावरून आता भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

उपाध्ये पोस्ट करत म्हणाले, ज्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना (Shivsena) स्थापन केली, रुजवली आणि वाढवली. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून बसले आहेत. आपली मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात, अशी अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे. अशी पोस्ट भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनीही गळ्यात घातलेल्या काँग्रेसच्या उपरण्यावरून भाष्य केले. भाषणाची सुरुवात त्यांनी, ‘काँग्रेसचे असलात तरीही जमलेल्या माझ्या बंधूनो, भगिनींनो आणि मातांनो’, अशी केली. तसंच ते पुढे म्हणाले, “मी आज खरंच काँग्रेसच्या कार्यक्रमाला आलो आहे हे बघायला स्वतःला चिमटा काढून पाहिला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला.

पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता.
मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. कारण समोरच्यांचं काही कर्तृत्व नाही.
दाखवा काय दाखवायचं ते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला