BJP-Shivsena MLA-Minister | मंत्रिपद गेले तरी नेत्यांचा रुबाब कायम; सरकारी तिजोरीतून सुरक्षेसाठी महिन्याला होतोय 10 लाखांचा खर्च
छत्रपती संभाजीनगर : BJP-Shivsena MLA-Minister | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री असलेल्या अनेक नेत्यांचा पराभव झाला, त्यांचे मंत्रिपद गेले. महायुती सरकारमध्ये (Mahayuti) मंत्री असलेले संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) हे खासदार झाले त्यांचंही राज्यातील मंत्रीपद गेले. सरकारी गाडी गेली.
मात्र, त्यांचा सरकारी बंदोबस्त मात्र अजूनही कायम आहे. याशिवाय, राज्यातील केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भागवत कराड (Bhagwat Karad), भारती पवार (Dr Bharti Pawar) हे आजही वाय दर्जाच्या सेक्युरिटीमध्ये सरकारी बंदोबस्तात फिरताना आढळतात.
सरकारी रुबाबात फिरणाऱ्या भागवतराव कराड यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी अजब उत्तर दिले. मंत्रीपद जाऊनही तुम्हाला सरकारी सुरक्षा कशी मिळते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भागवतराव कराड यांनी हसत हसत, मला माहिती नाही, असे उत्तर दिले. मला काहीच माहिती नाही. माझ्या सुरक्षेसाठी एक गाडी आहे, असे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांपासून काढता पाय घेतला. (BJP-Shivsena MLA-Minister)
केंद्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊन महिना उलटला मात्र माजी मंत्र्यांचा सरकारी रुबाब मात्र अजूनही कायम आहे.
या माजी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी महिन्याला प्रत्येकी दहा लाखांचा खर्च येतो.
त्यामुळे एवढा खर्च आणि पोलीस बंदोबस्तावरचा ताण का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये