BJP Strategy for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपची सहा नेत्यांवर विशेष जबाबदारी; निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

Amit Shah-Devendra Fadnavis

मुंबई : BJP Strategy for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | सर्वच पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. जागावाटपावरून दोन्हीकडे तीन-तीन पक्ष असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान भाजपने निवडणुकीची मायक्रो लेव्हलने तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या राज्यातील सहा नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रचाराच्या नियोजनापासून सर्व जबाबदारी त्यांच्यावर असेल.

विदर्भ – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), मराठवाडा – खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan), कोकण- मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), पश्चिम महाराष्ट्र – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), उत्तर महाराष्ट्र – मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मुंबई- आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) या नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी असेल.

निवडणुकीसाठीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आहेत. पक्षाचे दिल्लीतील मुख्यालय आणि मुंबईतील प्रदेश कार्यालयाने दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी हे नेते करतील.

भाजपने २०१४ च्या निवडणुकीत १२२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये हा आकडा १०५ झाला.
यावेळी भाजप १६० जागा महायुतीमध्ये लढेल असे म्हटले जाते.
त्यापैकी १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळात किमान ५० उमेदवार जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
महायुतीच्या जागा वाटपाला नवरात्रातच अंतिम स्वरुप दिले जाईल,
अशी माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. (BJP Strategy for Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed