BJP’s Executive Meet In Pune | पराभवाचे चिंतन, मनन करण्यासाठी भाजपचे पुण्यात अधिवेशन; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित
पुणे : BJP’s Executive Meet In Pune | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला म्हणावे असे यश मिळाले नाही. दरम्यान या अपयशाची जबाबदारी स्वीकारत आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मात्र वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय त्यांनी मागे घेतला. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केलेली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
भाजपकडून संवाद यात्रा (BJP Samvad Yatra) काढली जाणार आहे. विधानसभेसाठी व्यूहरचना, याचे आराखडे पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे रविवारी (२१ जुलै) होणाऱ्या प्रदेश कार्यकारणीच्या अधिवेशनात बांधले जाणार आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहेत. सकाळी दहा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या अधिवेशनात लोकसभेला राज्यात मिळालेल्या कमी प्रतिसादाबाबत चिंतन आणि मनन होणार आहे. अधिवेशनाला सुमारे पाच हजार पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. मंंडल प्रमुखापासून ते राज्याच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांंना या अधिवेशनात मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान अजित पवारांचा महायुतीतील प्रवेशाबाबतचे संभ्रम तसेच महायुती सरकारचे (Mahayuti Govt) चुकलेले निर्णय यावर कानउघाडणी होणार असल्याची चर्चा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक