BMC Election | सस्पेन्स संपला? ठाकरे बंधू एकत्रच युतीची घोषणा करणार; बड्या उमेदवारांची नावेही जाहीर होणार
मुंबई : BMC Election | मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर ही युती केव्हा आणि कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंबई निवडणूक संदर्भात युतीच्या घोषणेची प्रतीक्षा येत्या काही तासांत संपण्याची चर्चा आहे
आगामी एक-दोन दिवसांत युतीची अधिकृतरित्या घोषणा होईल, अशी शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत यांनी तसे अनौपचारिक संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरीत्या पत्रकार परिषद घेऊन युतीचा नारळ फोडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. कालच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार निवडीला होत असलेल्या विलंबामुळे, विश्वसनीय सूत्रांनुसार, दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करून काही उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.
