BMC Elections | महाविकास आघाडीत बिघाडी? महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून स्वबळाचे संकेत
मुंबई : BMC Elections | विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडता येईल एवढेही बहुमत मविआ मधील एकाही पक्षाला मिळवता आले नाही. दरम्यान निवडणुकीत मिळालेल्या अपयशासंदर्भात आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. असे असताना आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. (Brihanmumbai Municipal Corporation Election)
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena UBT Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सूचक वक्तव्य केले. संजय राऊत म्हणाले, ” मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावी लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरु झाले आहेत, तुम्ही सगळे पाहात आहात.
मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुकी स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही. मुंबई ओरबाडली जाते आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. मी हे म्हणत नाही की आम्ही स्वतंत्रपणे लढू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. आमची चर्चा सुरु आहे. “
राऊत यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचीही माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ते म्हणाले, “त्यांची (ठाकरे गट) काय इच्छा आहे? तो त्यांचा प्रश्न आणि आमची काय इच्छा आहे
ते आम्ही निवडणुकीवेळी पाहूयात. आजतरी आम्ही महापालिका निवडणुका कशा लढवायच्या? यासंदर्भात विचार केला नाही.
पण आम्हाला वाटतं की महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले पाहिजे. पण त्यांच्या पक्षाची तशी इच्छा असेल तर तशी आमचीही असेल”, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत