Bodyguard Commits Suicide | भाजप आमदाराच्या बॉडीगार्डची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; प्रचंड खळबळ

बुलढाणा : Bodyguard Commits Suicide | चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.३१) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. (Bodyguard Commits Suicide)
बुलढाणा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते सध्या बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये राहात होते. दरम्यान अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
अजय गिरी हे आज आमदार श्वेता महाले यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते.
अजय गिरी यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र अद्याप त्याची पुष्ठी झालेली नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार