Bopkhel Pune Crime News | खेळता-खेळता भयानक घडलं, तीन वर्षीय चिमुरडीचा जागेवरच मृत्यू
पुणे : Bopkhel Pune Crime News | बोपखेल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुले खेळत असताना त्यातील एका तीन वर्षीय चिमुरडीच्या अंगावर लोखंडी गेट कोसळल्याने (Iron Gate Collapses) तिचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील बोपखेल परिसरात बुधवार (दि.३१) हा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Footage) समोर आला आहे. (Bopkhel Pune Crime News)
गिरीजा शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. बोपखेल येथील गणेश नगर परिसरात ते रहात होते. ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गिरीजा ही चिमुकल्या मित्रांसोबत खेळत होती. हातात बाहुली घेऊन चिमुकली गिरीजा एका मैत्रिणी सोबत पळत सुटली होती. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने एका इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले.
मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडले. भले मोठे आणि वजनदार असलेले लोखंडी गेट अंगावर पडल्याचे पाहून तिच्यासोबत असणाऱ्या चिमुरड्यांनी पळ काढला आणि घरात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील आणि आजूबाजूच्या लोकांनी ते गेट उचलले. चिमुरडी गिरीजा वजनदार गेटखाली निपचित पडली होती.
तातडीने तिला उचलून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
असं खेळत असणाऱ्या चिमुरडी सोबत भयानक प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिघी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती
RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना