BSNL 99 Rupees Recharge Plan | गुडन्यूज! 99 रुपयात व्हाईस कॉल रिचार्ज प्लॅन, मिळणार अनलिमिटेड सुविधा; जाणून घ्या
मुंबई : BSNL 99 Rupees Recharge Plan | भारतीय सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) ने पुन्हा एकदा आपल्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमुळे खाजगी कंपन्यांसमोर आव्हान उभे केले आहे. TRAI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खासगी टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्त व्हॉइस ओन्ली प्लॅन आणायला सुरुवात केली असली तरी BSNL आधीपासूनच कमी किमतीत उत्तम पर्याय देत आहे.
बीएसएनएल (BSNL) च्या ९९ रुपायांच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अमर्यादित मोफत कॉलिंग मिळत आहे, ज्यामुळे इतर कंपन्यांच्या महागड्या कॉलिंग प्लॅनला हा धक्का मानला जात आहे. या प्लॅनची वैधता १७ दिवसांची असून, यामध्ये इंटरनेट डेटा किंवा एसएमएस (SMS) सेवा समाविष्ट नाही. जे वापरकर्ते फक्त कॉलिंगसाठीच सिमकार्ड वापरतात किंवा बीएसएनएल (BSNL) नंबर सक्रिय ठेवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
एअरटेल (Airtel) आणि Vi सारख्या कंपन्या आजही व्हॉइस सेवांसाठी जास्त शुल्क घेत आहेत, पण बीएसएनएल (BSNL) चा ९९ रुपयांचा प्लॅन अतिशय परवडणारा ठरतो. TRAI च्या निर्देशांनंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त व्हॉइस ओन्ली प्लॅन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे, मात्र बीएसएनएल (BSNL) आधीपासूनच कमी किमतीत उत्तम पर्याय देत आहे.
बीएसएनएल (BSNL) ने ४३९ रुपयांचा एक नवीन प्लॅनदेखील आणला आहे, ज्यामध्ये ९० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस (SMS) सेवा उपलब्ध आहे. हा प्लॅन जास्त काळ वैधता हवी असलेल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. (BSNL 99 Rupees Recharge Plan)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा