Budget 2024 Update | अर्थसंकल्पाबाबत महत्वाची अपडेट! 23 जुलैला होणार सादर; होऊ शकतात मोठ्या घोषणा

Budget-2024

नवी दिल्ली : Budget 2024 Update | अर्थसंकल्पाबाबत मोठी आपडेट समोर आली असून तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) येत्या २३ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पाकडून गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांना नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. यावेळी मोदी सरकार (Modi NDA Govt) कोण-कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाला लोकसभेला फटका बसल्याने यावेळी लोकप्रिय घोषणांची शक्यता आहे. (Budget 2024 Update)

दरम्यान, १२ जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. ते २२ जुलैपर्यंत चालणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट २०२४ सादर करणार असून केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.

मोदी सरकार तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट देईल अशी शक्यता आहे. एलपीजी सबसिडी सुरू करणे, विविध वस्तूंवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांच्या निधीत ६००० वरून वर्षाला ८००० रुपयांची वाढ, आदी घोषणा अर्थसंकल्पा होऊ शकतात.

याशिवाय ग्रामीण आवास योजनेतील राज्यांचा वाटा ५० टक्क्यांनी वाढविण्यात येईल,
असे म्हटले जात आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सलग
सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)