Buldhana Accident News | पुण्यातून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटीला दोन वाहनांची जोरदार धडक; 5 जणांचा मृत्यू, 24 प्रवासी जखमी

Buldhana Accident

बुलढाणा : Buldhana Accident News | जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी आणि बोलेरो या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास २४ प्रवासी जखमी झाल्याचे पुढे आले आहे. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जयपुर लांडे फाट्यासमोर हा विचित्र अपघात झाला. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला आधी चारचाकी वाहनाने मागून धडक दिली, त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. पहाटे अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत केली. तत्काळ पोलिस आणि आपत्कालीन सेवांना माहिती देण्यात आली. ही घटना पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. चिंताजनक अवस्थेत असलेल्या प्रवाशांना उच्चस्तरीय उपचारासाठी बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

You may have missed