Buldhana Crime News | विवाहित असूनही 25 वर्षीय युवतीवर प्रेम जडलं, स्वतःच्या घरात ही आणलं; पण विरहातून टोकाच पाऊल उचललं; इंस्टाग्राम वर व्हिडिओही बनवला

बुलढाणा : Buldhana Crime News | विवाहित असूनही २५ वर्षीय युवतीवर प्रेम जडलं. तिला स्वतःच्या घरातही आणलं. दोघेही एकत्र राहू लागले. काही कारणाने प्रेयसी निघून गेल्याने विरहातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली आहे. समाधान आटोळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, समाधान आटोळे या विवाहित असून जवळच असलेल्या एका गावातील २५ वर्षाच्या तरुणीवर प्रेम जडलं होते. या तरुणीला त्याने आपल्या घरातही आणले होते. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून ते सोबत देखील राहात होते. मात्र १३ मार्च रोजी समाधानची प्रेयसी घरातून निघून गेल्याने काल (२० मार्च) रोजी त्याने इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.