C. P. Radhakrishnan-Haribhau Bagade | सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; तर हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानचा पदभार

C. P. Radhakrishnan-Haribhau Bagade (1)

मुंबई : C. P. Radhakrishnan-Haribhau Bagade | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी देशातील सहा राज्यांकरिता नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. तर पुद्दुचेरीला नवीन नायब राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. (Governor Of Maharashtra)

सी. पी. राधाकृष्णन हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून म्हणजे १९७३ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाबरोबर काम करत आहेत. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात झाला. १९९८ ला कोईम्बतूर बॉम्बस्फोटानंतर त्यांनी भाजपाच्या तिकिटावर विजय मिळविला. २००४ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडली.

त्यानंतर त्यांनी भाजपच्या संघटन बांधणीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. २००४ च्या निवडणुकीसाठी त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम बरोबर भाजपाचे संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत देशाचे प्रतिनिधित्व केले.

राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२३ अशा सुमारे साडेतीन वर्षाच्या कालावधीत हे पद भूषवले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल ठरले आहेत.

नवे राज्यपाल आणि त्यांचा पदभार खालीलप्रमाणे,

राष्ट्रपतींनी संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. तर जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर त्यांच्याकडे मणिपूरची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. तर ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. हरिभाऊ किशनराव बागडे यांच्यावर राजस्थानचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रमण डेका यांची छत्तीसगड आणि सी. एच. विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाशनाथ यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या असल्या तरी त्या राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या नियुक्त्या लागू होणार आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

You may have missed