Camp Pune Crime News | कॅम्पमधील वाईन शॉपची तोडफोड; तिघांवर गुन्हा दाखल (Video)
पुणे : Camp Pune Crime News | कॅम्पमधील वाईन शॉपवर तिघा तरुणांनी कोयता, लोखंडी रॉडने हल्ला करुन तोडफोड केली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत आनंद झवारे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तोडफोडीमागील नेमके कारण समजू शकले नाही. (Camp Pune Crime News)
याबाबत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर (PI Girish Dighavkar) यांनी माहिती दिली की, कॅम्पमधील कल्पतरु सोसायटीत न्यूयॉर्क वाईन शॉप आहे. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तिघे जण हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आले. त्यांनी वाईन शॉपमध्ये शिरुन तिथे लोखंडी रॉड, कोयते मारुन तोडफोड केली. काचा फोडून आरडाओरडा करीत पळून गेले. हल्ला करण्यामागील नेमके कारण समजले नाही. लष्कर पोलीस तिघांचा शोध घेत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?