CBI Arrests CGST Superintendent in Bribery Case | सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह तिघांना 60 लाखांच्या लाचप्रकरणी सीबीआयची कारवाई

CBI

20 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मुंबई : CBI Arrests CGST Superintendent in Bribery Case | सीजीएसटीकडे असलेल्या एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून सेंट्रल जीएसटीच्या अधिकार्‍यांनी तब्बल ६० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ३० लाख हवालामार्फत स्वीकारले. त्यानंतर २० लाख रुपये स्वीकारताना दोघा खासगी व्यक्तीसह सीजीएसटी अधीक्षकांना सीबीआयने सापळा रचून पकडले. या तिघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात तब्बल ६ अधिकार्‍यांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, ४ अधीक्षक, सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग आहे.

तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सीजीएसटीच्या सातांक्रुझ कार्यालयात ४ सप्टेबरला सायंकाळी ते ५ सप्टेबर सायंकाळदरम्यान या अधिकार्‍यांनी त्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवले होते. एका अधीक्षकाने ८० लाख रुपयांची लाच मागितली. ती नंतर ६० लाखांपर्यंत कमी केली. तक्रारदारावर इतर तीन अधीक्षकांनी दबाव आणला होता. त्यांनी लाच देण्यास भाग पाडण्यासाठी जबरदस्ती आणि अपमानास्पद भाषा वापरली होती. त्यांना डांबून ठेवले, त्यावेळी तक्रारदाराच्या चुलत भावाशी लाचेची मागणी सांगण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर चुलत भाऊ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि इतर खासगी व्यक्तीशी लाचेची वाटाघाटी करण्यासाठी पोहचला. त्याला ६० लाख रुपये देण्यावर सहमती झाली. या रक्कमेपैकी ३० लाख रुपये तक्रारदाराला सोडण्यापूर्वी हवालाद्वारे देण्यात आले.

सीबीआयने सापळा रचला. सी जीएसटीच्या अधिकार्‍याच्या वतीने २० लाख रुपये स्वीकारताना चार्टर्ड अकाऊंटंटला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर सीजीएसटीचे अधीक्षक मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ खासगी व्यक्तीला भेटले,
तेव्हा त्यांनाही अटक करण्यात आली. आरोपीच्या कार्यालये आणि निवासी जागेसह ९ ठिकाणी झडती घेण्यात आली आहे.
त्यात अनेक गुन्हेगारी स्वरुपाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. (CBI Arrests CGST Superintendent in Bribery Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed