Chakan Pune Crime News | ‘तुझी बायको आहे का, तिला गाडीवरुन का फिरवतोस’ ! तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : Chakan Pune Crime News | ती तुझी बायको आहे का तिला तू गाडीवरुन का फिरवतोस, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. (Attempt To Murder)
चाकण पोलिसांनी (Chakan Police) शुभम भागवत पोळ, प्रदीप भागवत पोळ (दोघे रा. चाकण) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खेड तालुक्यातील मौजे येथे सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मावस भाऊ विलास सुरेश भिडे हा फिर्यादीची बहिण हिला मोटारसायकलवरुन घेऊन फिर्यादीचे घरी येत होता. तो मुटकेवाडी सिग्नलजवळ आला असताना तेथे शुभम पोळ याने विलास याच्याबरोबर भांडण काढून ही तुझी बायको आहे का तिला तू गाडीवरुन का फिरवतोस असे म्हणाला. त्यानंतर त्याने प्रदीप पोळ याला बोलावून घेतले. प्रदीप याने सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने विलास याला डोक्यात मारहाण केली. तो खाली पडल्यावर शुभम याने प्रदीप याच्या हातातील लाकडी दांडके घेऊन विलास याच्या डोक्यात पुन्हा वार केला. त्यात विलास हा बेशुद्ध झाला. हे पाहून ते प्रदीप पोळ याच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तरपाडे तपास करीत आहेत. (Chakan Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा