Chakan Pune Crime News | भाच्याने मामाचा गळा आवळून केला खून ! खूनामागे होते ‘हे’ कारण, सहा महिन्यांपासून शोधत होता संधी (Video)

पिंपरी : Chakan Pune Crime News | चाकण परिसरातील रासे गावातील मुंगसे वस्तीत ओढ्याजवळच्या झुडपात मिळालेल्या मृतदेहाचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. भाच्यानेच मित्राच्या मदतीने मामाचा गळा दाबून, तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याचे उघड झाले आहे. त्यामागील कारण ऐकल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. (Chakan Murder Case)
https://www.instagram.com/p/DAGgS5oJ9rK
मामा छोट्या मोठ्या कारणावरुन भाच्याला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण, शिवीगाळ करत होता. त्यामुळे तो मामाला संपविण्याची संधी गेल्या सहा महिन्यांपासून पहात होता.
https://www.instagram.com/p/DAGiBBHJo6Y
संदिप शिवाजी खंडे (वय ४०, रा. ठाकरवाडी, रासे, ता. खेड) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे तर. भाचा सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय ३७, रा. ठाकरवस्ती, रासे, ता. खेड) आणि त्याचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अघान अशी आरोपींची नावे आहेत.
https://www.instagram.com/p/DAGYk9BpBim
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासे गावाच्या हद्दीत मुंगसे वस्तीजवळील वाडेकर यांचे शेताचे बांधावरील झुडपामध्ये एका पुरुषाचा मृतदेह १९ सप्टेबर रोजी आढळून आला. त्याच्या चेहर्यावर मारहाण करुन जखमा करुन त्याचा चेहरा छिन्नविच्छीन्न केलेल्या अवस्थेत होता. चाकण पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो संदिप खंडे याचा असल्याचे समजले. संदिप खंडे हा आदल्या दिवशी १८ सप्टेबरला कोणाबरोबर होता, त्याचे कोणाशी वाद होते काय याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यात संशयित सुरेश मेंगाळ यानेच हा खून केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु, त्याच्या बोलण्यामध्ये वारंवार विसंगती येत असल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.
https://www.instagram.com/p/DAGVnHspNOj
त्याने सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून त्याचा दूरचा मामा संदिप खंडे हा छोट्या मोठ्या कारणावरुन त्याला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण शिवीगाळ करत होता. त्यामुळे तो सहा महिन्यांपासून त्याचा एकांत बघुन कायमचा संपविण्याचा विचार करत होता. १८ सप्टेबर रोजी तो अगोदरच दारु पिला असल्याने त्याला आरोपीने गोड बोलून रासे गावचे हद्दीतील वाडेकर यांचे शेतात निर्जनस्थळी नेऊन पुन्हा दारु पाजून झोपवले. त्यानंतर पुन्हा गावात देशी दारू आणण्यासाठी तो गेला. तेव्हा वाटेत त्याचा जवळचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल अघान भेटला. तेव्हा आरोपीने त्याला तू मला संदिप खंडे यास मारण्यासाठी मदत कर, असे सांगितले. त्यावर तो तयार झाला. दोघेही दारु घेऊन त्याला झोपविलेल्या ठिकाणी आले. टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने संदिप याचे तोंडावर जोरात मारहाण केली. त्यानंतर आरोपीने हाताने त्याचा जीव जाईपर्यंत गळा आवळला. त्याची हालचाल पूर्ण थांबल्यानंतर त्याला बाजूचे झुडपात ढकलून दिले.
https://www.instagram.com/p/DAF1I3TC3GV
सुरेश मेंगाळ याने कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने दुसरा आरोपी दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अघान याला ताब्यात घेतले.
https://www.instagram.com/p/DAFjxRCJoyk
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर,
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड,
पोलीस निरीक्षक नाथा घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड, कुंदा गावडे, गणपत धायगुडे,
पोलीस उपनिरीक्षक अभिजित चौगुले, संदिप बोरकर, सचिन मोरखंडे, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे,
भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, सुदशृन बर्डे, सुनिल भागवत, महेश कोळी, उद्धव गर्जे, महादेव बिक्कड,
रेवनाथ खेडकर, शरद खैरनार, नितीन गुंजाळ, मंगेश फापाळे यांनी केली आहे. (Chakan Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAFfFJgCyIJ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा