Chandan Nagar Pune Crime News | आयबीचा पोलीस असल्याचा बनाव करणार्‍या तोतया पोलिसाला अटक

Arrest

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | चारचाकी गाडीत पोलीस नावाची नेमप्लेट लावून आय बी असा लोगो लावणार्‍या तोतया पोलिसाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. (Totaya Police News)

इमाउद्दीन नाफिरुद्दीन इरफान (वय ३७, रा. गोदरेज इन्फिनिटी सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे या तोतया पोलिसांचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार नामदेव विठ्ठल गडदरे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Naga Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार चंदननगरमधील नागपोल रोडवरील मोकळ्या मैदानाच्या कडेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाउद्दीन इरफान हा काळे रंगाची टोयाटा कार घेऊन तेथे आला होता. त्यात पोलीस अधिकारी वापरतात, तसे पोलीस नावाची नेमप्लेट लावली होती. गाडीत पोलीस लाठी व आय बी असा लोगो जवळ बाळगला होता. पोलिसांना शंका असल्याने त्यांनी चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे दिसून आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस हवालदार रणदिवे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed