Chandan Nagar Pune Crime News | दुश्मनाबरोबर राहण्याने टोळक्याने दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | विश्वजीतबरोबर का राहता, असे विचारुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Kill)

याप्रकरणी उद्देश विलास शिंगारे (वय २७, रा. माळवाडी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली. शिंगारे यांच्यासह यश टारगे (वय १९, रा. करण रिहा सोसायटी, वडगाव शेरी) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील माळवाडीमधील सत्यम सेरिनेटी सोसायटी (Satyam Serenity Society) येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगारे त्यांचे मित्र यश टारगे, विश्वजीत पवार, सिद्धार्थ शेलार, सार्थक धुमाळ व लखन पवार हे गप्पा मारत होते. त्यावेळी चार ते पाच मोटारसायकलवरुन आठ ते दहा जण आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन विश्व्या कोठे आहे, असे विचारुन फिर्यादी यांना विश्वजीत बरोबर का राहतो, असे म्हणून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांनी तो वाचविण्यासाठी हातमध्ये घातला असताना डाव्या हातावर कोयत्याच्या वाराने गंभीर जखमी केले. फिर्यादी यांच्यावर आणखी वार करत असताना त्यांनी उजवा हातमध्ये घातला. तळहातावर तो वार बसला.

फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयता मारुन गंभीर जखमी केले. टोळक्यामधील एकाने यश टारगे याच्या पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. जाताना त्यांनी हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता, इंजिनिअरसह तिघांना अटक

Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे; पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो’ – अजित पवार

Maharashtra Assembly Election 2024 | मविआकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? दिल्लीतील गाठीभेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

You may have missed