Chandan Nagar Pune Crime News | चंदननगरमधील फक्त धड असलेल्या महिलेच्या खूनाचा उलघडा; भाऊ, वहिनीनेच मृतदेहाचे तुकडे करुन फेकले होते नदीत (Video)
पुणे : Chandan Nagar Pune Crime News | चंदननगरमध्ये नदीपात्रात एक डोके, हात पाय नसलेला मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या खूनाचा उलघडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पाटील इस्टेटमधील (Patil Estate Shivaji Nagar) खोलीच्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (Murder In Pune)
सकिना अब्दुल खान (४८, शिवाजीनगर, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा सख्खा भाऊ अशपाक अब्दुल खान (51) आणि वहिनी हमिदा अशपाक खान (45) या दोघांनी मिळून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. (Woman Murder In Chandan Nagar)
https://www.instagram.com/reel/C_Xrmd9JVdT/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
चंदननगर येथे नदीपात्रात २६ ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला होता. त्याला शीर, हात पाय नव्हते. कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता, शिवाय या मृतदेहाची ओळख पटण्यासारखी काहीही खूण जवळपास नव्हती.
पाटील इस्टेट भागात एका खोलीवरुन भाऊ व बहिणीचा वाद सुरु होता. ही खोली सकीनाच्या नावावर होती. तिचा भाऊ व वहिनी तिला निघून जाण्यास सांगत होते. पण ती जात नसल्याने दोघांनी तिची हत्या केली. पुण्यात २६ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस पडत होता. नदीला पूर आला होता. त्यांनी घरातच धारदार शस्त्राने सकीनाची हत्या केली. तिचे तुकडे करुन मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला होता. तो वाहत वाहत चंदननगरला आला होता.
https://www.instagram.com/reel/C_XvJkypjUz/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
सकीना घरी दिसत नसल्याचे शेजारच्या लक्षात आले. त्यांनी अशपाककडे चौकशी केल्यावर त्याने ती गावाला गेल्याचे सांगितले. परंतु, एका शेजारच्याला संशय आल्याने त्याने शिवाजीनगर पोलिसांच्या (Shivaji Nagar Police Station) कानावर ही बाब घातली. पोलिसांनी अशपाककडे चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याचा धीर तुटला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरील गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,
अप्पर आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव,
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदन नगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक अनिल माने,
गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, सिध्दनाथ खांडेकर,
पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, अश्विनी पाटील, पोलीस हवालदार विनोद तांदळे, रामचंद्र गुरव, महेश नानेकर,
सचिन रणदिवे, विश्वनाथ गोणे, सचिन घोलप, पोलीस नाईक नानासाहेब पतुरे, शिवाजी धांडे,
पोलीस अंमलदार प्रफ्फुल मोरे, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विकास कदम, नामदेव गडदरे,
अमोल जाधव, सचिन पाटील, संदीप गायकवाड यांनी तसेच गुन्हे शाखा युनिट ४ मधील पोलिसांनी केला आहे. (Chandan Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद