Chandan Nagar Pune Fire News | चंदननगर जकातनाक्याजवळील गोदामाला भीषण आग; फर्निचरचे गोदाम जळून खाक, शेजारील गोदामांना झळ

Pune Fire News

पुणे : Chandan Nagar Pune Fire News | नगर रोडवरील चंदननगर जकातनाक्याजवळ असलेल्या फर्निचरच्या गोदामाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामन दलाच्या ५ गाड्या व दोन टँकर यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत फर्निचरचे गोदाम संपूर्ण जळून खाक झाले असून या आगीची शेजारच्या गोदामांना झळ पोहचली आहे. सकाळी १० वाजताही कुलिंगचे काम सुरु होते.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव यांनी सांगितले की, चंदननगर येथील वाघेश्वर पार्किगजवळ अनेक गोदामे आहेत. त्यातील एका फर्निचरच्या गोदामाला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. हे २ हजार स्क्वेअर फुटाचे पत्र्यांचे गोदाम होते. अग्निशमन दलाला या आगीची वर्दी ७ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या ५ गाड्या व २ टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीनही बाजूने पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यानंतर काही मिनिटात आग विझविण्यात जवानांना यश आले. या आगीत फर्निचरच्या गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शेजारील गोदामांच्या पत्र्यांना झळ पोहचली. (Chandan Nagar Pune Fire News)

अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव, प्रमोद सोनावणे, रमेश गांगट,
विजय भिलारे व २० ते २५ जवानांनी आग विझविण्यात सहभाग घेतला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

You may have missed