Chandani Chowk pune Accident | दारुच्या नशेत कारचालकाने रोडच्या कडेला थांबलेल्या डिलिव्हरी बॉयला उडवले; कारचे चाक छातीवरुन गेल्याने बरगड्या फ्रॅक्चर, चालकावर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल (Video)

Chandani Chowk Pune Accident | Drunk Driver Hits Delivery Boy in Pune; Victim Suffers Rib Fractures, Case Registered

पुणे :  Chandani Chowk pune Accident |चांदणी चौकात स्विगीची ऑर्डर पडल्याने गाडी स्टॅन्डला लावून कडेला थांबलेल्या तरुणाला दारुच्या धुंदीत भरधाव जाणाऱ्या कारचालकाने जोरात धडक दिली.  रोडवर पडलेल्या या तरुणाच्या छातीवरुन कारचे चाक गेल्याने त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे.  बावधन पोलिसांनी कारचालकावर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची केस दाखल केली आहे.

https://www.instagram.com/p/DSaLKlDCZv4

प्रसाद दिलीप मिसाळ (वय २६, रा. शिवदर्शन, पर्वती) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ओमकार राम हटकर (वय २४, रा. शिवदर्शन, पर्वती) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तेजस बाबुलाल चौधरी (रा. पेल्बस वन, बावधन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात चांदणी चौकातील इराणी कॅफेजवळ १६ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद मिसाळ हा स्विगी  डिलिव्हरी  बॉय म्हणून काम करतो.ती स्विगीची ऑर्डर घेऊन प्रसाद जात होता. चांदणी चौकाजवळ स्विगीची ऑर्डर पडल्याने तो गाडी स्टॅन्डला लावून थांबले होता. यावेळी पाठीमागून भरधाव कार आली. तिने प्रसाद याला धडक दिली. तो खाली पडल्यावर कारचे चाक त्याच्या छातीवरुन गेल्याने त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. हाता पायांना मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ससून रुग्णालयात हलविले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने गुरुवारी त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांनी सांगितले की, कारचालकाच्या धडकेने प्रसाद मिसाळ हा गंभीर जखमी झाला असून गुरुवारी त्याला खासगी रुग्णालयात हलविले आहे. कारचालक तेजस बाबुलाल चौधरी याच्या तोंडाला दारु पिल्यासारखा वास येत होता. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन तो दारुच्या अंमलाखाली असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यावरुन त्याच्यावर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची केस करण्यात आली आहे. 

You may have missed