Chandrakant Patil- Baner Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

Chandrakant Patil

बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा – चंद्रकांत पाटील

पुणे : Chandrakant Patil- Baner Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर, बालेवाडी (Balewadi), सोमेश्वरवाडी (Someshwarwadi) भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण असून पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते. (Chandrakant Patil- Baner Pune Flood)

पाटील म्हणाले, शहरातील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागात नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात पुरपरिस्थिती टाळण्याकरीता पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविण्याबाबत सर्वेक्षण करावे. या कामी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल पाटील म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा