Chandrakant Patil | चंद्रकांतदादांनी कोथरुडच्या वैभवात आणखी भर घातली! श्री म्हातोबा बॅंक्वेट हॅाल लोकार्पणप्रसंगी सर्वसामान्य कोथरुडकरांची भावना
ना. चंद्रकांतदादा कोथरुड मधील सर्व मुलींचे पालक झालेत – हभप चंद्रकांत महाराज वांजळे
पुणे : Chandrakant Patil | ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडच्या वैभवात आणखीनच भर घातली असून; कोथरुडकरांचे खऱ्या अर्थाने पालक आहेत, अशी भावना सर्वसामान्य कोथरुडकरांनी आज व्यक्त केली. चंद्रकांतदादा कोथरुड मधील सर्व मुलींचे पालक झाले आहेत, असे गौरवोद्गार हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी काढले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरुडचे ग्राम दैवत श्री म्हातोबा मंदिर परिसरात बॅंक्वेट हॉल उभारण्यात आला असून, त्याचे लोकार्पण ना. पाटील आणि सर्व कोथरुड ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी कोथरुड देवस्थानचे अध्यक्ष गजानन(नाना) भेलके, उपाध्यक्ष शंकर मोकाटे, सचिव संतोष माथवड, खजिनदार तानाजी गाढवे, सदस्य पंढरीनाथ दुधाने, महादेव वांभिरे, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, विनय गानू, भाजप कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप महिला मार्चा मध्य मंडल अध्यक्षा हर्षाली माथवड यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅंक्वेट हॅालच्या लोकार्पणप्रसंगी हभप चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले की, ना. चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुड मधील गोरगरीबांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. कोथरुड मधील हजारो मुलींचे पालकत्व घेतलं आहे. त्यासाठी सुकन्या समृद्धी, सुखदा, मानसी, शिष्यवृत्ती, झाल अशा विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून कोथरुड मधील लेकींचे पालक झाले आहेत. त्यांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे कोथरुडकरांना नेहमीच भावते. बॅंक्वेट हॉलच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील मुलींचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे; ह्यासाठी ही व्यवस्था उभी करुन गरीब कुटुंबातील मंगल कार्याची तजवीज केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे , अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट
देवस्थानच्या तिजोरीत पैसे कमी पडणार नाहीत- ना. पाटील
हिंदू संस्कृतीत मंदिरातील दान पेटी ही समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जात असते. कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबांच्या आशीर्वादाने देवस्थानला समाज कार्यासाठी कधीही पैसे कमी पडले नाहीत, भविष्यात ही पडणार नाहीत. बॅंक्वेट हॉल उभारताना देवस्थान समितीला विनंती केली होती की, हा हॉल गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी अल्पदरात उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे हॅालच्या देखभालीसाठी 40 हजार आणि 20 हजार शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एखाद्या गरजू कुटुंबाला तेवढी रक्कम देणे शक्य होत नसेल, तर ते देतील ती रक्कम देवस्थानने घ्यावी, उर्वरित रक्कम देवस्थान समितीला लोकसहभागातून देण्यासाठी प्रयत्न करु, असे ना. पाटील यांनी यावेळी आश्वास्त केले. तसेच, तीन वर्षे लोकसहभागातून हॅालची देखभाल व्यवस्था करु, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी केली
