Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या अभिनव उपक्रम, फिरते वाचनालयाला एक वर्ष पुर्ण, वाचनालयात 5 हजार पुस्तकांचा समावेश

पुणे : Chandrakant Patil | विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. याच पुण्यात खेळाळून वाहणाऱ्या ज्ञानगंगामुळे असंख्य आयुष्य पावन झाली आहेत. यातच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अनेक शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले आहे. चंद्रकांतदादा यांनी सुरू केलेल्या फिरते वाचनालयाला यावर्षी एक वर्षे पूर्ण झाली आहेत.
चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरूड मतदारसंघात फिरते मोफत वाचनालय हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. या फिरत्या वाचनालयात जवळपास 5 हजार पुस्तकांचा समावेश असून आता पर्यंत वाचनालयाचा लाभ घेणाऱ्यांना कसलाही त्रास झालेला नाही. विशेष म्हणजे या उपक्रमाचा आतापर्यंत अगदी लहान मुलांपर्यंत ते आबालवृद्धांनी लाभ घेतला आहे.
एका बाजूला वाचन संस्कृती लोप पावत असतांना तसेच व्हाट्सएपच्या, फेसबुक आणि आणि युट्युब तसेच सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेली तरूणाई पुस्तके वाचू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा आता सगळ्या स्तरातून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, पुस्तकांचे स्थान मानवाच्या जीवनात गुरुस्थानी आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. संपन्न होतो. काळाच्या ओघात वाचन संस्कृती लोप पावत चालेल ही संस्कृती माझ्या कोथरूडमध्ये खोलवर उजावी यासाठी ‘फिरते वाचनालय’हा अभिनव उपक्रम राबविला आहे. याचा कोथरूडकर लाभ घेत असल्याची बाब अत्यंत आनंददायक आहे. अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Chandrakant Patil)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण