Chandrakant Patil | पुण्यात 7 नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती ! 816 पोलिस, 60 कोटींचा निधी; कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पुणे: Chandrakant Patil | पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार असून, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या भागांचा समावेश आहे. यामुळे या निर्णयासाठी पाठपुरावा करणाऱ्या कोथरूडचे (Kothrud Assembly) आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे.
नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्णयासोबतच पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी आणि ८१६ अतिरिक्त पोलिस कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे, पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक प्रभावी आणि ठाम पाऊल उचलण्यात आले आहे.
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात पोलिस दलाची ताकद आणखी वाढणार आहे. यासोबतच पुणे शहरात हजारो नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. दक्ष पोलिस अधिकारी आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुणेकरांना एक सुरक्षित वातावरण मिळणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांना हा निर्णय निश्चितच दिलासा देणारा ठरतो आहे. पुणेकर या निर्णयासाठी महायुतीला मनापासून धन्यवादही देत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)