Chandrakant Patil – Kunal Tilak | सरकारी नोकऱ्या कमी, व्यवसाय करून इतरांना नोकरी द्या – चंद्रकांत पाटील

Job Fair In Pune

400 हुन अधिक युवकांना तत्काळ रोजगार मिळाला – कुणाल शैलेश टिळक

पुणे : Chandrakant Patil – Kunal Tilak | भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कुणाल शैलेश टिळक ह्यांच्या प्रयत्नातून दि १५ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ह्यांच्या जन्मदिनानिमित्त व जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त भव्य नोकरी महोत्सव (Job Fair) आयोजित केला होता. लोकमान्य सभागृह, टिळक वाडा, येथे झालेल्या ह्या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच राज्यसभा सदस्य खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) व भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) ह्यांची विशेष उपस्थिती होती.

नोकरी महोत्सवात संपूर्ण राज्यातून तब्बल दोन हजार युवकांनी नोंदणी केली. विशेष म्हणजे ४०० हुन अधिक युवकांना जागीच नोकरी मिळाली व चंद्रकांत दादा पाटील ह्यांच्या हस्ते ऑफर लेटर हि देण्यात आले. बँकिंग, फिनान्स, सेल्स, मार्केटिंग, मॅनुफॅक्टअरिंग, KPO BPO अश्या विविध क्षेत्राततील नामवंत ७० कंपन्यांनी रोजगार मेळाव्याला हजेरी लावली. रोजगार मेळाव्यात बोलताना चंद्रकांत दादा पाटील ह्यांनी महाराष्ट्र राज्य मध्ये असणाऱ्या शैक्षणिक संस्था व त्यामधून बाहेर पडणारा उच्चशिक्षित युवा वर्ग ह्यांना मार्गदर्शक सल्ला देत, “प्रत्येक युवकाने आपल्यामध्ये सातत्याने नवीन स्किल आत्मसात करायला हवे व व्यवसाय कसा करायचा ह्याचे ट्रैनिंग शिक्षण संस्थांनी द्यायला हवे, तसेच सरकारी नोकरी च्या मागे धावण्यापेक्षा खासगी कंपनी मध्ये नोकरी करा किंवा व्यवसाय करून इतरांना नोकरी द्या”, असाही सल्ला दिला. धीरज घाटे ह्यांनी हि भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून रोजगार विषयक धोरण व उपक्रम ह्याबद्दल माहिती दिली.

नोकरी महोत्सवाला शासनाच्या रोजगार विषयक धोरणांची माहिती देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रैनिंग अँड डेव्हलोपमेंट इन्स्टिटयूट ह्यांनी हि आपली प्रदर्शनी भरवली.

ह्या मेळाव्यास माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, हेमंत रासने, पुनीत जोशी, राघवेंद्र बाप्पू मानकर,
राजेश येनपुरे, संदीप बुटाला, रत्नदीप खडके, अजय खेडेकर, शंतनू कांबळे, आरती कोंढरे, राजेंद्र काकडे,
उमेश चव्हाण, अरविंद कोठारी, अमित कंक, सुनिल रसाळ, रौनक शेट्टी,
रमाकांत कापसे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed