Chandrakant Patil News | दादा तुम्ही आम्हाला आमच्यातलेच जास्त वाटता! सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांची भावना; सोसायटी संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Chandrakant Patil News | दादा, तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो. अशी भावना कोथरूड मधील सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील आपल्या प्रचारार्थ आज कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. (Kothrud Assembly Election 2024)
आज त्यांनी कोथरुड मधील जोशी म्युझियम परिसरातील सिद्धार्थ पॅलेसमधील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, भाजपा नेते प्रशांत हरसुले प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, प्रतिक खर्डेकर, विनिता काळे उपस्थित होते.
यावेळी सोसायटीचे पादाधिकारी कोल्हटकर म्हणाले की, “दादा, तुम्ही महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मोठे आहातच; पण या मंत्रीपदापेक्षा तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो.” त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनीही नम्रपणे कतज्ञता व्यक्त केली.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ४० टक्के कर सवलती मुळे सर्व पुणेकरांना दिलासा मिळाला असल्याची माहिती दिली. तसेच, मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे कोथरुड मधील नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच, कोथरूडकरांच्या सेवेसाठी सदैव समर्पित असल्याची भावना ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”