Chandrakant Patil On Dhananjay Munde | मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठे भाष्य; म्हणाले – ‘… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील’

Chandrakant Patil

सांगली: Chandrakant Patil On Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh Murder Case) जवळपास दीड महिना उलटला. मात्र तरीही अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तसेच ज्यांना आरोपी म्हणून अटक केली, त्यांच्यावरही कडक शासन होत नाही, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. चौकशी होईपर्यंत मुंडे यांनी पदापासून दूर राहावं, अशी मागणी होत आहे. यावर आता भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले, ” मस्साजोग प्रकरणात चौकशी सुरू आहे. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे. तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील.

पोलीस यंत्रणा हत्या प्रकरणाची चौकशी करत असून एसआयटीही नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. पण माध्यमात विविध बातम्या आल्या तर त्याचा चौकशीवर परिणाम होतो”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. (Chandrakant Patil On Dhananjay Munde)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

You may have missed